औरंगाबाद- चिकलठाणा येथील महावितरणच्या 132 केव्ही उपकेंद्रातील पंचवीस क्षमतेच्या ट्रान्सफार्मरला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन बंबांच्या सहाय्याने तब्बल दोन तास अथक मेहनत करत ही आग आटोक्यात आणली.
चिकलठाणा येथील महावितरणच्या 'ट्रान्स्फरमर'ला भीषण आग - Sachin Jire
चिकलठाणा येथील महाविरणच्या उपकेंद्रातील ट्रान्स्फरमरला आग लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात.
शनिवारी संध्याकाळी अचानक चिकलठाणा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरला आग लागलेली ही आग काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच आग विजवण्यासाठी सिडको, चिकलठाणा आणि गरवारे येथील अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे महावितरण वाहिन्या बंद पडल्या होत्या. चिकलठाणा एमआयडीसी, सिडको आदी भागात दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रान्सफार्मर जळून खाक झाले होते.