महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर यमराज सेल्फी काढेल - News about traffic cops

औरंगाबादमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळण्यात आला. या निमित्त औरंगाबाद अँब्यूलन्स हेल्प रायडर ग्रुप तर्फे वाहतूक नियम जनजागृती करण्यासाठी सेल्फी विथ यमराज उपक्रम राबवण्यात आला.

Traffic Safety Week was celebrated in Aurangabad
वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर यमराज सेल्फी काढेल

By

Published : Jan 14, 2020, 2:33 PM IST

औरंगाबाद -सेल्फी आज काल सर्वच जण काढतात. मात्र, औरंगाबादच्या रस्त्यावर चक्क यमराज सेल्फी काढताना दिसला. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा माझ्यासोबत मेल्यावर सेल्फी घ्यावा लागेल, असा संदेश या यमराज आणि चित्रगुप्तने लोकांना दिला. औरंगाबाद वाहतुक पोलीस आणि परिवहन विभाग यांच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताह पळाला जात आहे. त्या निमित्ताने औरंगाबाद अँब्यूलन्स हेल्प रायडर ग्रुप तर्फे वाहतूक नियम जनजागृती करण्यासाठी सेल्फी विथ यमराज उपक्रम राबवण्यात आला. दूध डेअरी सिग्नलवर हा उपक्रम राबविण्यात आला.

वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर यमराज सेल्फी काढेल

वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी औरंगाबादमध्ये हा सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताहात वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागातर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये औरंगाबाद अँब्यूलन्स हेल्प रायडर ग्रुप तर्फे अभिनव उपक्रम राबवला. रस्त्यावर अचानक यमराज आणि चित्रगुप्त अवतरले. ते वाहतूक नियम न पाळणाऱ्या लोकांसोबत सेल्फी काढू लागले. काही लोकांना फुल देऊन गांधीगिरी पण यमराज आणि चित्रगुप्तने केली. वाहतूक नियम किती महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला. अँब्यूलन्स हेल्प रायडरच्या सदस्यांनी गळ्यात विविध फलक घालून वाहतुकीचे नियम पाळण्याचे संदेश लोकांना दिले. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा अपघाताला सामोरं जावे लागेल. अपघातात आपल्या जीवाला काही झाले तर आपल्या कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागेल, याचे महत्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न हेल्प रायडर ग्रुप तर्फे करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details