औरंगाबाद- कन्नड तालुक्यात कालपासून रिमझिम पाऊस चालू आहे. अशात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 चे काम सुरू आहे. यासाठी वापरण्यात येणारी माती ही महामार्गावर जमा होती, ती पावसामुळे ओली झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून वाहतूक खोळंबली आहे.
महामार्गावर चिखल झाल्याने नागरिकांना आपली वाहने चालविण्यात समस्या होत आहे. महामार्गाचे काम सातकुंड पर्यंत असल्याने सातकुंड तांडा ते कन्नड पर्यंत काल (सोमवार) रात्री 8 वाजेपासून आज सकाळी पर्यंत महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले असून यात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.