औरंगाबाद - पैसे दुप्पट करण्याच्या लालसेला बळी पडलेल्या एका व्यापाऱ्याला चार लाखांना गंडा घालण्यात आला. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिशोर नाक्यावर संबंधित घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भानुदास काशिनाथ मगर, असे फसवणूक झालेल्या आले व्यापाऱ्याचे नाव आहे. बहिरगाव येथील संदीप पवार हा देखील आलं व्यापारी असल्याने त्याच्याशी ओळख झाली. दहा बारा दिवसांपूर्वी संदीप पवारच्या आईने घरी बोलावून एक लाख रुपये जमा केले, तर पैसे दुप्पट करून देतो, असे सांगणाऱ्या महाराजाचा मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर पैसे जमा करू लागले. बुधवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान महाराजांनी अण्णाभाऊ साठे चौकात बोलावले. त्या ठिकाणी महाराजाची भेट झाली.