महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कोरोनाचे 57 नवीन रुग्ण, बाधितांचा आकडा 958 वर - world health emergency

शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून रविवारी सकाळी 57 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाचे नवे 57 नवीन रुग्ण
कोरोनाचे नवे 57 नवीन रुग्ण

By

Published : May 17, 2020, 11:49 AM IST

औरंगाबाद - शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून रविवारी सकाळी 57 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 वर पोहोचली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कन्नड तालुक्यात रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात देखील संसर्ग पोहोचत आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन. सहा, सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 26 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details