महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिल्लोडमधील शिक्षकाने काढलेल्या चित्राची 'टोर्सो इंडिया'ने घेतली दखल - सिल्लोड शिक्षक चित्र

जगप्रसिध्द अजिंठ्याच्या लेणीचे पद्मपाणीच्या कॅनवासवरील ऑइल कलरमधील चित्राला 'टोर्सो इंडिया' या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

चित्र
चित्र

By

Published : Jul 21, 2021, 5:51 PM IST

Updated : Jul 21, 2021, 6:01 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) - शिक्षकाच्या 'अजिंठ्याच्या' चित्राने जागतिक झेप घेतली असून जगप्रसिध्द अजिंठ्याच्या लेणीचे पद्मपाणीच्या कॅनवासवरील ऑइल कलरमधील चित्राला 'टोर्सो इंडिया' या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यामुळे सर्वत्र सध्या या चित्राचे कौतुक केल्या जात आहे.

चित्र काढणारे शिक्षक गजेंद्र आवारे

टोर्सो इंडियाकडून दखल

जग प्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील भित्तीचित्रे काळाच्या ओघात नष्ट होत चालली आहेत. लेण्यातील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येईल, एवढीच चित्रे आता शिल्लक राहिली आहेत. अनेक चित्रे दिसत नाहीत, धूसर झाली आहेत. तर काही चित्रांची तोडमोड झाली आहे. ही चित्रे कशी असतील याचा अभ्यास करून ती पूर्ण करण्याचा ध्यास काही चित्रकारांनी घेतला आहे. सिल्लोड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गजेंद्र आवारे यांनी अजिंठ्यातील चित्रे पुनरुज्जीवित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सप्टेंबर 2017 ते जून 2021 असे या कालावधीत आवारे यांनी 148" 51" इंचचे भव्य पद्मपाणी व भगवान बुद्ध व इतरांचे चित्र काढले. काळाच्या ओघात लेणीतील काही चित्र फिकट, लुप्त झाले आहे. कॅनवासवर चित्र काढताना महागडे रंग, इतर साहित्यावर हजारों रुपये खर्च झाले आहे. जगप्रसिध्द अजिंठ्याच्या लेणीचे पद्मपाणीच्या कॅनवासवरील ऑइल कलरमधील चित्राला 'टोर्सो इंडिया' या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. टोर्सो इंडियाच्या उपक्रमात जागतिक स्तरावरील चित्रकाराचा समावेश आहे. यामध्ये सर्व पंच हे आंतरराष्ट्रीय असून मोठ्या पारदर्शकपणे विविध चित्राची निवड केली जाते. अशा ठिकाणी सिल्लोड सारख्या ग्रामीण भागातून गजेंद्र आवारे या शिक्षकाच्या चित्राची निवड जागतिक स्तरावर झाली असून हा देशासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. त्यांना याकामी पत्नी छाया आवारे व भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक श्रीकांत मिश्रा यांची मदत झाली आहे. अजिंठ्याच्या लेणीचे सर्व कॅनवासवर पुर्नज्जीवित करण्याचा मानस आवारे यांनी बोलून दाखविला.

सिल्लोडचा जागतिक सन्मान

अजिंठा लेणीमुळे सिल्लोड तालुक्याचा नाव जागतिक पातळीवर झाला आहे. तसेच तालुक्यातील काही व्यक्तिमत्वाची कीर्ती जागतिक पातळीवर पोहचली असताना मागील आठवड्यात सिल्लोड येथील प्राथमिक शिक्षक गजेंद्र आवारे यांच्या चित्राला जागतिक पातळीवर पारितोषिक मिळाले असल्याने सिल्लोडचा पुन्हा जागतिक पातळीवर सन्मान झाला आहे.

हेही वाचा-Mumbai Rain - मुसळधार पावसामुळे पशु-पक्षी संकटात, पॉज'सह 'एसीएफ' संस्थेने दिला मदतीचा हात

Last Updated : Jul 21, 2021, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details