औरंगाबाद (गंगापूर) - टोमॅटोला हमीभाव मिळावा या मागणीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लासुर येथे टोमॅटो फेको आंदोलन करीत सरकारचा निषेध केला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लासुर स्टेशन येथील औरंगाबाद मुबंई हायवेवर सावंगी चौकात शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्यावर सुमारे ट्रकभर टोमॅटो फेकुन आंदोलन करण्यात आले. गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी टोमॅटो पिकांचे उत्पादन घेतात. टॉमेटोला भाव गडगडल्याने प्रति कॅरेट 70 ते 80 रुपये दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च निघणे कठीण झाले आहे. टोमॅटोला पाचशे रुपये प्रति कॅरेट हमीभाव देण्यात यावा या मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गळ्यात टोमॅटोच्या माळा घालत औरंगाबाद मुंबई हायवेवर लासुर येथील सावंगी चौकात टोमॅटो फेको आंदोलन केले आहे.
टोमॅटोचे भाव घसरले, ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप - tomatoes markate
गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी टोमॅटो पिकांचे उत्पादन घेतात. टॉमेटोला भाव गडगडल्याने प्रति कॅरेट 70 ते 80 रुपये दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च निघणे कठीण झाले आहे. टोमॅटोला पाचशे रुपये प्रति कॅरेट हमीभाव देण्यात यावा या मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी गळ्यात टोमॅटोच्या माळा घालत औरंगाबाद मुंबई हायवेवर लासुर येथील सावंगी चौकात टोमॅटो फेको आंदोलन केले आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या
टोमॅटोला प्रति क्रेट पाचशे रुपये हमी भाव जाहीर करावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर करावे, बंद केलेल्या टोमॅटोची निर्यातबंदी तत्काळ उठवावी, लासुर स्टेशन येथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव, उपसरपंच रवी चव्हाण, अण्णासाहेब जाधव, संजय पांडव, राजू थोरात, पंढरीनाथ गवळी, कृष्णा गवळी, कैलास निमोणे, ज्ञानेश्वर कराळे, कल्याण पवार, गणेश निघोटे, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.