औरंगाबाद - शहरातील चितेगाव भागात रात्रीच्या सुमारास तीन दुकाने फोडून रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये चार ते पाच चोरटे कैद झाले आहेत. घटनेचा तपास बिडकीन पोलीस करत आहे.
चितेगावच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या समर्थ ज्वेलर्स, आरोही मेडिकल, सागर प्रॉव्हिजन्स या तीन दुकानांना रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लक्ष केले. तोंडाला रुमाल बांधून या चोरट्यांनी मेडिकल मधील 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केले. तर सुवर्ण विक्रीच्या दुकानातील साहित्याचा पंचनामा सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज गेला, हे मात्र अजून कळू शकले नाही.