महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात विविध घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्येने हळहळ

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी विविध घटनांमध्ये ३ जणांनी आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी विविध घटनेत तिघांची आत्महत्या

By

Published : Jul 26, 2019, 8:25 PM IST

Updated : Jul 26, 2019, 9:20 PM IST

औरंगाबाद- येथील वाळूज औद्योगिक नगरीत विविध घटनेत महिला व पुरुषाने तर वैजापूर येथील सटाणा गाव येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात विविध घटनांमध्ये ३ जणांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात विविध घटनेत तिघांच्या आत्महत्येने हळहळ

अरुणा सोमनाथ डव्हाळे (वय २०, म्हाडा कॉलनी, वाळूज महानगर) या महिलेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने छताच्या पाईपला गळफास घेत आत्महत्या केली. तर संजय रमेश शिंदे (पंढरपूर, वाळूज) यांनी ओढणीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनेतील आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तिसरी घटना वैजापूर तालुक्यातील आहे. सागर जाधव (वय २१, रा. सटाणा, वैजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक महिती अशी की, मृत सागर हा तरुण शेतकरी आहे. घरच्यांसोबत शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करायचा. २३ जुलै रोजी त्याने विष पिल्याने तो अस्वस्थ झाला होता. ही बाब घरच्यांना लक्षात येताच त्यांनी त्यास तातडीने वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Last Updated : Jul 26, 2019, 9:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details