औरंगाबाद - जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सायंकाळी 65 वर्षीय महिलेला लागण झाल्याचे आढळून आल्याने आता एकूण रुग्णसंख्या 32 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासांंमध्ये 11 जण कोरोनामुक्त झाले असून उपचारानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात आले. मात्र, गेल्या चोवीस तासात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महामारीचे सावट कायम आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासात तीन नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 32 वर - aurangabad corona news
जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सायंकाळी 65 वर्षीय महिलेला लागण झाल्याचे आढळून आल्याने आता एकूण रुग्णसंख्या 32 वर पोहचली आहे.
औरंगाबादमधील समता नगर परिसरात 35 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री निष्पन्न झाले. लागण झालेली व्यक्ती फर्निचरचे काम करतो. सोमवारी सकाळी आरिफ कॉलनीतील 55 वर्षीय व्यक्तीला आणि संध्याकाळी आसेफिया कॉलनीतील 65 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ही महिला नक्की कोणाच्या संपर्कात आल्याने तिला बाधा झाली, याबाबत तपास सुरू आहे. या महिलेच्या संपर्कात असणाऱ्या चार ते पाच जणांची चाचणी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहा जणांना उपचारानंतर रविवारी घरी सोडण्यात आले. आता पर्यंत उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या 14 वर गेली आहे. तसेच तीन रुग्ण दगावले असून 15 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.