औरंगाबाद - 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात हा 3 दिवसांचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला दलाई लामा आणि भिक्खू महानायक महाथेरो डॉ. रकगोडा धम्मसिद्धी हजेरी लावणार आहेत.
औरंगाबादमधील नागसेन वन परिसरात या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातून लाखो उपासक या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागसेनवन परिसरातील स्टेडीयममध्ये भव्य एका बुद्ध नगरीची स्थापना केली जात आहे.