औरंगाबाद :जिल्ह्यातील कन्नड शहरात आजपासून कोव्हिड रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली. यात शहरातील क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे नगरपरिषदेच्या वतीने पहिला टप्पा घेण्यात आला आहे. यामध्ये ३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कन्नड शहरात रॅपीड अँटीजेन चाचणी सुरू, पहिल्याच दिवशी ३ कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कन्नड शहरात आज रॅपीड अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये 3 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कन्नड शहरात आज रॅपीड अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात शहरातील जवळपास १०० भाजीविक्रेत्यांचे नमुने घेण्यात आले. यापैकी 3 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या नंतर, व्यापारी, छोटे मोठे दुकानदार, सलूनचालक, कृषी सेवा चालक, दूध विक्रेते यांचीसुद्धा चाचणी करण्यात येईल, असे नगरपरिषदेचा वतीने सांगण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, गटविकास अधिकारी कृष्णा वेणिकर, नगरसेवक अनिल गायकवाड़, नगरसेवक रवि राठोड, प्रवीण काशिनंद, डॉ. प्रवीण पवार, तसेच नगरपरिषद कर्मचारी, ग्रामीण रुग्णाल्याचे कर्मचारी मोठ्या संखेने उपस्तिथ होते.