महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये तरुणांना हत्यारे विकणारी टोळी गजाआड - cidco police aurngabad

सिडको पोलिसांना शहरातील तरुणांना इतर जिल्ह्यातून हत्यारे आणून विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी एमजीएम संस्थेजवळील रोडवर सापळा रचून कारमध्ये विक्रीसाठी हत्यारे घेऊन आलेल्या तिघांना केली.

three accused arrested illegal selling knives

By

Published : Oct 14, 2019, 4:26 PM IST

औरंगाबाद - शहरातील तरुणांना हत्यारे विकणाऱ्या टोळीतील 3 जणांना सिडको पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून हत्यारे आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. अमोल गणपत लहाने (21), योगेश नारायण घुगे (20), प्रफुल्ल नामदेव बोरसे (19, सर्व रा. मयूर पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

हेही वाचा -मुंबई : महिला रुग्णावरील बलात्कारप्रकरणी 58 वर्षीय डॉक्टरला अटक

सिडको पोलिसांना शहरातील तरुणांना इतर जिल्ह्यातून हत्यारे आणून विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी एमजीएम संस्थेजवळील रोडवर सापळा रचून कारमध्ये विक्रीसाठी हत्यारे घेऊन आलेल्या तिघांना केली.

हेही वाचा -संग्रामपूर तालुक्यात चोरट्यांचा कृषी केंद्रावर दरोडा

कारवाईत आरोपींकडून 2 तलवारी, 2 धारदार पाते, कुकरी आणि चाकू, अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -मुंबईत पत्नीची हत्या करून वृद्धाची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details