औरंगाबाद - कोरोना विषाणूबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही. पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून हे दाम्पत्य ज्या लोकांना भेटले आहे त्या लोकांचीही तपासणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पुण्याचे कोरोनाग्रस्त दाम्पत्य एका टुरींग कंपनीमार्फत चाळीस लोकांसोबत दुबईला गेले होते. दुबईमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. ज्या चाळीस लोकांसोबत हे दाम्पत्य गेले होते त्या सर्वांचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील या दाम्पत्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे उपचार स्वतंत्र कक्षात केले जात आहेत.
हेही वाचा -दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण