महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Crime: सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला लावला चुना; अधिकारी असल्याची बतावणी करून लुटले सोने - सोने लुटले

अधिकारी असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटल्याची घटना गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ घडली आहे. विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी अधिकारी असल्याची बतावणी करून निवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन तोळे सोने घेऊन पोबारा केला आहे. भरदिवसा चोरीची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aurangabad Crime
सोने लुटले

By

Published : Feb 12, 2023, 7:46 AM IST

औरंगाबाद :गंगापूर शहरातील नूतन कॉलनी परिसरातील महावितरनचे सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल बनकर हे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आपल्या दुकानात पायी जात होते. त्यावेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने त्यांना थांबवले. आपण अधिकारी असल्याचे भासवत चोरीची भीती दाखवून हातातील व गळ्यातील सोने काढून रुमालात टाकायला सांगितले. हातचालाकी करून एक लाख रुपयांचे सोने लांबवले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात चोरींच्या, गुन्हेगारीच्या घटनेत वाढ :गंगापूर शहरात मागील काही दिवसापासून भरदिवसा चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. 30 जानेवारी रोजी एटीएमची अदलाबदल करून निवृत्त शिक्षकाला 35 हजार रुपयाला दोन भामट्यांनी चुना लावला होता. 4 फेब्रुवारी रोजी भर दिवसा महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला होता. तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात जमाव जमल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पोलीस ठाण्यास रात्री अकरा वाजेदरम्यान भेट दिली होती.


सहा महिन्यापासून पोलीस निरीक्षकाचे पद रिक्त :गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाचे पद हे सहा महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात देण्यात आला आहे. गंगापूर शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून भरदिवसा लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे गंगापूर पोलीस ठाण्याला पूर्ण वेळ अधिकारी देण्याची मागणी एमआयएम पक्षाकडून पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

2022 मधील औरंगाबादमधील वाहनचोरी घटना :औरंगाबाद शहरात 2022 मध्ये सर्व प्रकारची 918 वाहने चोरीला गेली होती. यातील 854 या दुचाकींचा समावेश होता. चोरी झाल्यावर वाहनाचा शोध घेणे शक्य होत नसल्याचे देखील समोर आले होता. चोरलेली दुचाकी ग्रामीण भागात विकली जाते किंवा तोडफोड करून सुटे भाग करून विकण्यात येत होते. त्यामुळे 918 वाहन चोरींपैकी केवळ 293 वाहने पुन्हा जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. विशेष म्हणजे रुग्णालय, मॉल, शैक्षणिक संस्था, रस्त्यावर लावलेली वाहने चोरीला जात आहेत. यामुळे शहरातील ठिकाणे दुचाकी चोरींचे हॉटस्पॉट बनले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Mumbai Crime: दुचाकी चालकाच्या डिक्कीत सापडले दागिने आणि रोख रक्कम; वाहनचालकास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details