औरंगाबाद -मोबाईलच्या दुकानातून भर दिवसा चोरट्याने व्यापाऱ्याची पैशांची बॅग पळवल्याची घटना सिल्लोड शहरात घडली आहे. या घटनेत व्यापाऱ्याचे 1 लाख 5 हजार रुपये रोख, 5 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सिल्लोड शहरातील भगतसिंग चौकात श्री राजकुमार धनश्यामदास कटारिया यांच्या मालकीचे साईबाबा लाईट हाऊस हे मोबाईलचे दुकान आहे. आज(30नोव्हेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास कटारिया नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील दोन बॅग दुकानात ठेवल्या. काही कामानिमित्त कटारिया शेजारच्या दुकानात गेले असता चोरट्याने एक बॅग पळविली.