औरंगाबाद -देशात आता विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेता नसेल, असे विधान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाची खिल्ली उडवली. औरंगाबादेत भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर कडाडून टीका केली.
केंद्राप्रमाणे आता राज्यातही विरोधी पक्षनेता राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
देशात आता विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेता नसेल, असे विधान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाची खिल्ली उडवली. औरंगाबादेत भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीत थांबायला कोणी तयार नाही. त्यांची मुजोरी लोकांनी अनुभवली आणि म्हणून त्यांना जनतेने नाकारले आहे. आम्ही पाच वर्षात काम केले आहे. लोकांचा विकास केला आहे आणि त्याच विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेचा जनादेश घेत आहोत. पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्र समृद्ध करण्याचा संकल्प करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.औरंगाबादेत आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. चिकलठाणपासून तर सिडको बस स्टँड पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोडशो केला. त्यानंतर शहरातील सांस्कृतिक मैदानावर त्यांनी सभा घेतली. या सभेला मराठवाड्यातील भाजपचे सगळे नेते हजर होते.मागील पाच वर्षांत राज्यात काय-काय कामे केली याचा पाढा मुख्यमंत्र्यांनी या सभेत वाचला. मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करणार, गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा सुजलाम-सुफलाम करू, आत्ताची पिढी ही दुष्काळ पाहणारी अखेरची पिढी असेल. पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली. देश काँग्रेसमुक्त करायचा आणि राज्य राष्ट्रवादी मुक्त करायचे आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी या वेळी केले.