औरंगाबाद- पैठण शहरात व तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण आज पैठण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. शहरातील 9 आणि परिसरातील 3 अशा एकूण 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
पैठण तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, ग्रामीण रुग्णालयाची माहिती - कोरोना विषाणू
पैठण शहर आणि परिसरात आतापर्यंत 3 हजार 329 लोकांची चाचणी करून त्यांनी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहर आणि परिसरात आतापर्यंत 3 हजार 329 लोकांची चाचणी करून त्यांनी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर औरंगाबाद येथील कोरोना संक्रमित परिचारिकेशी पैठण तालुक्यातील काही लोकांचा संपर्क आल्यानंतर पैठण तालुक्याचे नाव संक्रमित यादीत जोडले गेले होते. त्यानंतर संपर्कात आलेल्या 6 आणि इतर 6 अशा सर्व लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने सर्व नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
तसेच औरंगाबाद-पैठण आणि अहमदनगर तसेच बीडला जोडलेल्या सर्व रस्त्यांवर चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करूनच पैठणच्या सीमेच्या आत सोडले जात आहे. दरम्यान, शहरात आणि तालुक्यात संचारबंदीचे कडेकोट पालन करण्याचे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.