औरंगाबाद - कन्नड शहरातील हिवरखेडा रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात काल (सोमवारी) मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केंद्रातील सीसीटीव्ही फोडून चोरट्यांनी एलसीडी चोरी केली.
कन्नडमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रात चोरी हेही वाचा-'नाणार' विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
स्वामी समर्थ यांची पितळी मूर्ती चोरट्यांनी केंद्राबाहेर गेट जवळ काढली. मात्र, त्यांना मूर्ती चोरून नेता आली नाही. आठवड्यात शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. स्वामी समर्थ केंद्रातील चोरीची घटना सकाळी ६:३० वाजता दूध विक्रेते यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती आसपासच्या रहिवाशांना दिली.
तीन ते चार वर्षांपूर्वी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानतंर पहिलीच घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी उप निरिक्षक जाधव, पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. गत आठवड्यात तीन दिवसांपूर्वी दत्तनगरमधील दत्त मंदिराची दानपेटी फोडून रक्कम पसार केली होती. तर महामार्गाजवळील मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता. तालुक्यातील नागद येथील सेवा केंद्रातील दानपेटी फोडण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.