औरंगाबाद - शहरातील आझाद चौकात काल (रविवारी) झोमॅटोची डिलीव्हरी करणाऱ्या मुस्लिम तरुणाला जय श्रीरामचा बोलण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादेत मुस्लिमांना 'जय श्रीराम' म्हणायला लावले, आठवड्यातील दुसरी घटना - पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद
आझाद चौकात झोमॅटोची डिलीव्हरी करणाऱ्या दोन तरुणांना जय श्रीरामचा जप करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे
![औरंगाबादेत मुस्लिमांना 'जय श्रीराम' म्हणायला लावले, आठवड्यातील दुसरी घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3908614-thumbnail-3x2-aurgangabad.jpg)
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी करणारे दोन मुस्लीम तरुण दुचाकीवरून जात असताना त्यांना एका पांढऱ्या कारमधील चार जणांनी अडविले. यांनतर त्यांच्याकडून बळजबरीने 'जय श्रीराम'चे नारे वधवून घेतले. या घटनेनंतर शहरातील आझाद चौकात मोठा जमाव जमला होता व वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रण मिळवले.
तरुणाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यातील ही शहरातील दुसरी घटना आहे. या दोन घटनेमुळे शहरातील सामाजिक वातावरण गढुळ झाल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चार जणांचा शोध घेत आहे. आरोपींविरूद्ध एफआयआर नोंदविला गेला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांनी दिली.