औरंगाबाद- कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकत असताना खासगी टँकर विहिरीत कोसळला. ही घटना पैठण तालुक्यातील बालानगर शिवारातील रहेमान करीम कुरेशी या शेतकऱ्याच्या शेतात घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पाण्याने भरलेला टँकर विहिरीत कोसळला - ग्रामस्थ
रहेमान कुरेशी यांच्या शेतातील विहिरीत हे खासगी टँकर दररोज पाणी पुरवठा करायचा. नेहमीप्रमाणे हे टँकर पाण्याने भरून आले. यावेळी त्यातील पाणी विहिरीत टाकण्यासाठी टँकर मागे घेत असताना चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे टँकरचे चाक विहिरीच्या कठड्यावरून खाली घसरले. यावेळी टँकर पाण्याने पूर्णपणे भरलेले असल्यामुळे जोरात विहिरीत खाली कोसळले.
रहेमान कुरेशी यांच्या शेतातील मोसंबीच्या बागेला या खासगी टँकरने रोज पाणी पुरवठा करण्यात येत होता. नेहमीप्रमाणेच टँकर (एम. एच. ०४-९१९२) भरून आले. यावेळी टँकरमधील पाणी विहिरीत टाकण्यासाठी टँकर मागे घेत असताना चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे टँकरचे चाक विहिरीच्या कठड्यावरून खाली घसरले. टँकर पाण्याने पूर्णपणे भरलेले असल्यामुळे जोरात विहिरीत खाली कोसळले.
ही बाब टँकर चालक विष्णू दिनकर तानवडे (वय ३५ रा. खादगाव, ता. पैठण) यांच्या ताबडतोब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून टँकरमधून खाली उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. परंतु, तब्बल ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत पाण्याने भरलेले टँकर जोरदार कोसळल्याने टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बघण्यासाठी शिवारातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.