औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी विशेष उत्साह दिसून आला दुपारच्या वेळी अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.
पैठणमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली - पैठण विधानसभा मतदारसंघ
पैठण विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
![पैठणमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4829106-thumbnail-3x2-aur.jpg)
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवाशक्तिमध्ये मोठा उत्साह दिसत होता. शहरातील एकूण २९ मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पैठण विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९३ हजार ९२६ मतदार आहे. त्यापैकी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख १० हजार २९३ झाले आहे. 71.55% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी राजाभाऊ कदम यांनी दिली आहे.
पाचोड येथील जिल्हापरिषद शाळेच्या केंद्रावर आमदार भुमरे यांनी मतदान केले. तर पैठण शहरातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे दत्तात्रय गोर्ड यांनी सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, तालुक्यातील वाहेगाव येथील मतदान केंद्र क्र.४ वर इव्हीएम नादुरूस्त झाली होती. त्यामुळे जवळपास एक ते दीड तास मतदान प्रक्रिया प्रभावित झाली. तसेच ईसारवाडी मतदान केंद्र क्र. १७८ व दरेगाव जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र.क्रमांक १३५ वरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यानंतर लगेचच दुसर्या मशिनद्वारे प्रक्रिया पार पाडण्यात आली.