गंगापूर : औरंगाबाद- नगर महामार्गावर टिप्पर आणि दुचाकीचा अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मीराबाई नंदू बोराडे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, नितीन नंदू बोराडे गंभीर जखमी झाला आहे.
धडक देऊन टिप्पर झाला फरार -
वडगाव रामपुरी येथील नितीन नंदू बोराडे हा आपली आई मिराबाईसह दुचाकीवरून (एम. एच. 20 ई ए-9306) काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद ते नगर रोडने गंगापूरकडे जात होता. यावेळी जिकठाण फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा टिप्परने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यानंतर घटनास्थळावरून हायवा टिप्पर चालक फरार झाला.
हेही वाचा -गुजरातमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपीला पुण्यातून अटक