औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथील शेतकरी गजानन विनायक जोशी (वय 35) यांनी शेतातील नुकसान झाल्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे.
सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा तिसरा बळी, शेतकऱ्याची नदीत उडी मारून आत्महत्या - गजानन जोशी आत्महत्या न्यूज
गजानन जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते. खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. 'जर पाऊस दोन दिवसांत थांबला नाही तर मी विहिरीत उडी घेईन', असे जोशी यांनी अनेकांजवळ बोलले होते.
हेही वाचा -'अवकाळी' च्या थयथयाटात पीक जमीनदोस्त; पहा कवितेतून मांडली परभणीच्या शेतकऱ्याने आपली व्यथा
गजानन जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते. खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. 'जर पाऊस दोन दिवसांत थांबला नाही तर मी विहिरीत उडी घेईन', असे जोशी यांनी अनेकांजवळ बोलले होते. तीन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील धानोरा गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर, याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला होता.