औरंगाबाद :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी केलेले वक्तव्य शिवसेना आपल्या भूमिका बदलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आहे. विशेषतः मुस्लिम बांधवांचा द्वेष करण्याची शिकवण नसल्याचे त्यांनी सांगितलं. ही भूमिका आगामी काळातील मतदारांसाठी बदलेली ध्येयधोरण आहे की मागील अडीच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून मिळालेला संगत गुण, असा प्रश्न उपस्थित होतोय.
पहिल्यांदाच मुस्लिम समाजाबाबत केले वक्तव्य :शिवसेना प्रमुखांनी कधीही मुस्लिम समाजाचा द्वेष करा, अशी शिकवण दिली नाही. कोणत्याही समाजाबाबत द्वेष करू नका, आपला धर्म घरी ठेवून या. रस्त्यावर आल्यावर देश हा धर्म म्हणून फिरा, असं ते सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. रस्त्यात पडलेली कुराण आदराने उचलून ठेवणाऱ्या महाराजांची शिकवण आहे. त्यामुळे आपण द्वेष करू शकत नाही. आपल्या देवांचा अवमान केलेला आपल्याला चालणार नाही, तर इतरांच्या धर्मीयांचा अवमान केलेला कसा चालेल. भाजपच्या तिनपाट प्रवक्त्याने केलेले विधान म्हणजे अवमान करणारे आहे.ते विधान भाजपचे आहे, देशाचे नाही, असे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत केले. त्यामुळे शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी, अशी असणारी विचारधारेत बदल करीत आहे, असे संकेत दिले जात आहेत का? असा विचार अनेकांच्या मनात आला आहे.