अमरावती - जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे असलेल्या संत्रा मंडीला भीषण आग लागली. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली. यात तीन संत्रा मंडी जळून खाक झाल्या आहे. यामध्ये जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अमरावतीच्या चांदुर बाजारमधील संत्रा मंडीला भीषण आग, 80 लाखांचे नुकसान - Water tanker
आज सकाळी साडेनऊ वाजता शॉट सर्किटने ही आग लागली. आग एवढी भयंकर सुरू होती, की दूरपर्यंत आगीचा धूर हा पसरलेला होता.
संत्र्याची मुख्य बाजारपेठ म्हणून चांदुर बाजारची ओळख आहे. ब्राम्हणवाडा थंडी मार्गावर दरवर्षी सात ते आठ संत्रा मंडी उभारण्यात येते. आज सकाळी साडेनऊ वाजता शॉट सर्किटने ही आग लागली. आग एवढी भयंकर सुरू होती, की दूरपर्यंत आगीचा धूर हा पसरलेला होता.
आगीची माहिती मिळताच चांदुर बाजार नगरपरिषद अग्निशमन दलाचे एक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. तर सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीकडूनही टँकरने पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू होते. आग मोठी असल्याने अमरावतीसह इतरही ठिकाणाहून अग्निशमन दल दाखल होणार होते. पण अग्निशामक दलाची गाडी उशीरा पोहोचल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता.