महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषदेतर्फे निविदा प्रक्रिया न झाल्याने पोषण आहारापासून बालके वंचित - निविदा प्रक्रिया

लॉकडॉउन मध्ये बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्यासाठी घरपोच पोषण आहार पुरवण्याचे आदेश आहे. मात्र जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालविकास विभागाची निविदा प्रक्रिया न झाल्याने बालके आहारापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

पोषण आहार
पोषण आहार

By

Published : Apr 17, 2021, 10:36 PM IST

औरंगाबाद - तीन ते सहा वयोगटातील बालकांना सक्षम करण्यासाठी पोषण आहार दिला जातो. यामुळे बालकांची वाढ व तंदुरुस्ती वाढण्यास मदत होते. यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पोषक आहार योजनेचा लाभापासून दोन महिन्यांपासून वंचित असल्याच्या तक्रारी येत आहेत.

बालकांना सुदृढ करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा पोषण आहार दिला जातो. मात्र कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्याने सध्या बालकांना घरपोच आहार देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. परंतु जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या वाळूज, रांजणगाव, फुलंब्री नगरपंचायत अजंठा येथील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहे.

निविदा प्रक्रिया न झाल्याने बालके वंचित

लॉकडॉउनमध्ये बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्यासाठी घरपोच पोषण आहार पुरवण्याचे आदेश आहे. मात्र जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालविकास विभागाची निविदा प्रक्रिया न झाल्याने बालके आहारापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details