महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 7, 2021, 2:09 PM IST

ETV Bharat / state

भांडण सोडवणाऱ्या सुरक्षा रक्षकावरच जमावाचा हल्ला, कंपनीचीही तोडफोड

कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केल्याच्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने कंपनी मालमत्तेची तोडफाड केली आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केल्याच्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने कंपनी मालमत्तेची तोडफाड केली आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकाचा भांडण सोडवण्याचा प्रयत्न, जमावाकडून कंपनीची तोडफोड

अशी आहे घटना

वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक ई - 5 मधील आकार टूल्स या कंपनीत भगवानराव साडूजी निकम (42) रा. वडगाव (को.) हे सुरक्षा रक्षक आहेत. रात्री आठ वाजेच्या सुमारास भगवानराव निकम व त्यांचे सहकारी कमलाकर गिरीराज, देविदास मोरे, शिवप्रसाद विश्वकर्मा, असे हजर होते. रात्री अंदाजे पावणे आठ ते आठ वाजेच्या सुमारास आकार टूल्स कंपनीच्या मेन गेट समोर पांढऱ्या रंगाची स्कुटी व काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवरून आलेले सहा जण दोन मुलांना मारहाण करीत होते. त्यावेळी भगवान निकम हे सुरक्षा रक्षक वाद सोडवण्यासाठी गेले होते. दोघांना मारहाण करू नका, असे म्हणत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सहा जणांच्या टोळक्याने निकम यांना शिवीगाळ करत कंपनीची सुरक्षा रक्षक केबिन आणि परिसरातील वाहनांवर दगड मारून तोडफोड केली.

सहा जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी भगवानराव सांडूजी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी शुभम मनोहर राठोड (वय 21 वर्षे. रा. दत्तनगर रांजणगाव), आकाश प्रकाश साळवे (वय 19 वर्षे. रा. शिवनेरी कॉलनी रांजणगाव), कृष्णा गोरखनाथ भालेराव (वय 19 वर्षे. रा.लक्ष्मी माता मंदिर जवळ रांजणगाव), पवन प्रकाश दूधमोगरे (वय 21 वर्षे. रा. पवननगर रांजणगाव), दिपक कल्याण कानडे (वय 21 वर्षे. रा. देवगिरी कॉलनी रांजणगाव) आणि आकाश राजू गायकवाड (वय 22 वर्षे. रा. दत्तनगर रांजणगाव) यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -अभिनेता रजत बेदीच्या कारची एक पादचाऱ्याला धडक

ABOUT THE AUTHOR

...view details