औरंगाबाद- घरात किरकोळ वादानंतर सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. काही तासाने मात्र ती थेट विहिरीत पडलेली दिसली. वडिलांनी भाऊ व इतर दोघांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर मदतीसाठी आलेले लोक निघून गेले. वडिलांनी घरातील इतरांना घरात बंद करुन मोठ्या मुलीला थेट विहिरीजवळ पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसानंतर पोलिसांना गावातील हा प्रकार कळाला. बुधवारी उशीर झाल्याने आता गुरूवारी मुलीचा पुरलेला मृतदेह पुन्हा वर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुलीचा मृत्यूचे कारण समोर येईल. परंतू मुलगी विहिरीत सापडल्यानंतर तिला परस्पर पुरण्याची घाई का केली, कुटूंबातील इतरांना घरात का कोंडले, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. राधा जारवाल असे मुलीचे नाव आहे.
पोलीस तपासात गुन्ह्याची बरीचशी उकल
दौलताबाद परिसरातील टाकळीकदीम गावात शेतकरी कैलास जारवाल राहतात. त्यांना पत्नी, तीन मुली व दोन मुले आहेत. २२ सप्टेंबर रोजी दुपारी दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांना टाकळीकदीम गावातून कॉल प्राप्त झाला. गावातील एका सतरा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे कॉलवरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर आडे यांनी तत्काळ इतर सहकाऱ्यांसह गावात धाव घेतली. जारवाल कुटूंबाच्या घरी पाेहोचल्यानंतर कोणीही काही बोलायला तयार नव्हते. विचारपूस सुरू केल्यानंतर जारवाल यांनी त्यांना तीन मुली व दोन मुले असल्याचे सांगितले. मात्र, मोठी मुलगी राधा कुठे आहे, असे विचारताच कुटूंबातील सर्वच जण शांत झाले. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तिच्या वडिलांनी तीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. मात्र, त्याव्यतिरीक्त काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी कुटूंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू केल्यावर वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत गेली.
सर्वच प्रश्न अनुत्तरीतच, संशय मात्र कायम