महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मजुरांचे मृतदेह आज रात्री पाठवण्यात येणार - मंत्री मीना सिंग - मंत्री मीना सिंह

करमाड जवळील रेल्वे अपघातात ठार झालेल्या मजुरांचे मृतदेह आज रात्री रेल्वेने जबलपूर येथे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ते मृतदेह शववाहीकेने त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.

minister meena sinh
मंत्री मीना सिंग

By

Published : May 8, 2020, 8:31 PM IST

Updated : May 8, 2020, 9:00 PM IST

औरंगाबाद- करमाड जवळील रेल्वे अपघातात ठार झालेल्या मजुरांच्या चौकशीसाठी व इतर मदत कार्यासाठी मध्यप्रदेशचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक पथक औरंगाबादेत दुपारी विशेष विमानाने दाखल झाले आहे. अपघातात जखमींची मध्यप्रदेश सरकारच्या मंत्री मीना सिंह यांनी भेट घेतली. घटना दुर्दैवी असून आज रात्री मृतांचे मृतदेह रेल्वेने पाठवण्यात येणार असल्याची माहिती मीना सिंह यांनी दिली.

संवाद साधताना मध्यप्रदेशचे मंत्री मीन सिंग
मध्य प्रदेश सरकारकडून उच्चाधिकाऱ्यां‍चे एक पथक विशेष विमानाने औरंगाबादला आले आहे. या पथकामध्ये मंत्री मीना सिंह, आयएएस अधिकारी केसरी सिंग, आयपीएस अधिकारी राजेश चावला यांचा समावेश आहे.

औरंगाबादहून रात्री एक रेल्वे जबलपूरला जात आहे. त्या रेल्वेने मृतदेह नेले जाणार आहेत. तेथून शववाहिकेने प्रत्येकाच्या गावाला मृतदेह पाठवण्यात येतील, अशी माहिती मंत्री मीना सिंह यांनी दिली. त्या म्हणाल्या ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. शासनाकडून विविध जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्यात येत आहे. मध्यप्रदेशचे जे नागरिक महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अडकले आहेत. त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पायी चालत किंवा सायकलवर कोणीही आपल्या गावी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा -लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

Last Updated : May 8, 2020, 9:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details