औरंगाबाद - सायकलवर पैठणला जाणाऱ्या भाविकाला बसने चिरडल्याची घटना गेवराई तांडा येथे रविवार (दि. 20 मार्च) रोजी सायंकाळी घडली. जिमसिंग चव्हाण अस मृत भाविकाचे नाव आहे. (Bus Cyclist Accident On Gevrai Road ) बस पैठणकडून भरधाव वेगाने औरंगाबादकडे जात होती. यामध्ये जिमसिंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते औरंगाबादकडून पैठणला दिंडीला चाललेले होते.
Bus Cyclist Accident On Gevrai Road : पैठणला वारीसाठी जाणाऱ्या सायकलस्वार भाविकाला बसने चिरडले - bus crushed the devotee
सायकलवर पैठणला जाणाऱ्या भाविकाला बसने चिरडल्याची घटना गेवराई तांडा येथे रविवार (दि. 20 मार्च) रोजी सायंकाळी घडली. (Bus Cyclist Accident On Gevrai Road ) जिमसिंग चव्हाण अस मृत भाविकाचे नाव आहे. बस पैठणकडून भरधाव वेगाने औरंगाबादकडे जात होती. यामध्ये जिमसिंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते औरंगाबादकडून पैठणला दिंडीला चाललेले होते.
घटनास्थळावरील बसचा फोटो
पुढील तपास पोलीस अंमलदार संपत राठोड हे करत आहेत
जिमसिंग हे सायकल चालवत रस्त्याच्या कडेने जात होते. दरम्यान, वेगात आलेल्या बसने जोरदार धडक दिल्याने जिमसिंग दुरपर्यंत फरपटत गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर बस चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच, या घटनेबाबत चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार संपत राठोड हे करत आहेत.