औरंगाबाद- भाऊसिंगपुरा येथील तेवीस वर्षीय तरुणाने स्वतच्या घरासमोरुन बापाची दुचाकी चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
मुलानेच चोरली बापाची दुचाकी; खाक्या दाखवताच दिली कबुली - auranagabad crime news
भावसिंगापुरा येथील राहणारे रिक्षाचालक प्रवीण निवृत्ती मुंडे (वय-५० रा.भीमनगर, भावसिंगपुरा) यांनी २३ डिसेंबर रोजी रात्री घरासमोर दुचाकी उभी केली होती. मात्र, रात्रीतून घरासमोर असलेली दुचाकी अज्ञात आरोपीने चोरी केली.
अज्ञातविरोधात दिली होती तक्रार....
भावसिंगापुरा येथील राहणारे रिक्षाचालक प्रवीण निवृत्ती मुंडे (वय-५० रा.भीमनगर, भावसिंगपुरा) यांनी २३ डिसेंबर रोजी रात्री घरासमोर दुचाकी उभी केली होती. मात्र, रात्रीतून घरासमोर असलेली दुचाकी अज्ञात आरोपीने चोरी केली. याप्रकरणी प्रविण मुंढे यांनी या प्रकरणी त्यांनी १ जानेवारी रोजी छावणी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खक्या दाखवाताच दिली कबुली.....
पोलीसांनी या घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मुंढे यांच्या मुलावर संशय आला. दरम्यान संशयावरून मुंडे यांचा मुलगा सौरव प्रवीण मुंडे वय-२३ (रा.जोगेश्वरी, ता.गंगापूर) विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीचे उत्तर दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. वडिलांची दुचाकी मी स्वतः चोरल्याचे कबुल केले. चोरलेली दुचाकी त्याने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मित्राकडे ठेवली असल्याचे पोलिसांना सांगितले.
आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल.....
दरम्यान छावणी पोलिसांनी आरोपी सौरव प्रवीण मुंडे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे असलेली दुचाकी मागवण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास साह्ययक फौजदार सुरेश जिरे करीत आहेत.