औरंगाबाद- बेपत्ता असलेला वाहनचालक कैलास अरुण आढाव (२३, रा. गिरजामातानगर) याचा मृतदेह मिटमिटा येथील गट क्रमांक १०९ मधील पडीक विहिरीत सापडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीत आढळला 'त्या' बेपत्ता वाहनचालकाचा मृतदेह - Aurangabad Crime News
बेपत्ता असलेला वाहनचालक कैलास अरुण आढाव (२३, रा. गिरजामातानगर) याचा मृतदेह मिटमिटा येथील गट क्रमांक १०९ मधील पडीक विहिरीत सापडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![विहिरीत आढळला 'त्या' बेपत्ता वाहनचालकाचा मृतदेह विहिरीत आढळला 'त्या' बेपत्ता वाहनचालकाचा मृतदेह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10648321-600-10648321-1613468067013.jpg)
घरातून झाला होता अचानक बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास आढाव हा २६ जानेवारी रोजी घरात काही न सांगता अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार छावणी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी कैलासचा शोध सुरू केला होता. पोलिसांचा शोध सुरू असतानाच, परिसरातील शेतात काम करणाऱ्या एका महिलेला सोमवारी दिनांक 15 रोजी विहिरीमध्ये एक मृतदेह आढळून आला. या महिलेने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो कैलास आढाव याचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप अस्पष्ट असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.