महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरात 700 कॅमेऱ्याद्वारे ठेवली जाणार करडी नजर - aurangabad latest news

शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'कमांड कंट्रोल रूम' शनिवारपासून कार्यान्वित झाली आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर 50 सीसीटीव्ही फीडसह सुरू झालेल्या. या कंट्रोल रूममध्ये 31 मार्चपर्यंत 700 कॅमेऱ्यांद्वारे पोलीस शहरातील कानाकोपऱ्यावर नजर ठेवणार आहेत.

शहरात 700 कॅमेऱ्याद्वारे ठेवली जाणार करडी नजर
शहरात 700 कॅमेऱ्याद्वारे ठेवली जाणार करडी नजर

By

Published : Jan 17, 2021, 10:56 AM IST

औरंगाबाद - शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'कमांड कंट्रोल रूम' शनिवारपासून कार्यान्वित झाली आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर 50 सीसीटीव्ही फीडसह सुरू झालेल्या. या कंट्रोल रूममध्ये 31 मार्चपर्यंत 700 कॅमेऱ्यांद्वारे पोलीस शहरातील कानाकोपऱ्यावर नजर ठेवणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कंट्रोलच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कंट्रोल तुमचे कौतुक केले.

शहरात 700 कॅमेऱ्याद्वारे ठेवली जाणार करडी नजर
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटवर्क कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वीडनच्या अ‌ॅक्सिस कंपनीचे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या, दुचाकी चोरी या यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे.आदित्य ठाकरेंकडून कौतुकमहानगरपालिका व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. पर्याववरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रीसंदिपान भुमरे उपस्थित होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वीस मिनिटे या कंट्रोल रूमची कार्यपद्धती समजून घेतली. औरंगाबाद पोलिसांनी सुरू केलेली ही यंत्रणा उत्तम असून याबद्दल आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, सुरेश वानखेडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आदींची या वेळी उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details