महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनुदानाच्या मागणीसाठी औरंगाबादेत शिक्षकांचा घंटानाद - aurangabad teachers agitation

शिक्षण समन्वय संघाच्या आवाहनावरून गेल्या 35 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला औरंगाबादमधील शिक्षकांनीही पाठिंबा दर्शवित गुरूवारी घंटानाद आंदोलन केले.

अनुदानाच्या मागणीसाठी औरंगाबादेत शिक्षकांचा घंटानाद
अनुदानाच्या मागणीसाठी औरंगाबादेत शिक्षकांचा घंटानाद

By

Published : Mar 5, 2021, 10:45 AM IST

औरंगाबाद :मुंबईतील आझाद मैदानात अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी औरंगाबादमध्ये शिक्षकांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी या शिक्षकांनी नियमांप्रमाणे अनुदान देण्याची मागणी केली.

शिक्षण समन्वय संघाच्या आवाहनावरून गेल्या 35 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला औरंगाबादमधील शिक्षकांनीही पाठिंबा दर्शवित गुरूवारी घंटानाद आंदोलन केले. यावेळी या शिक्षकांनी आझाद मैदानातील आंदोलकांना झालेल्या अटकेचा निषेधही केला. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून काम करीत आहेत. शाळेला अनुदान नसल्याने अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रचलित नियमांनुसार शिक्षकांना अनुदान द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी घंटानाद करून विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी एस पी जवळकर, वाल्मिक सुरासे, मुख्याध्यापक प्रकाश मोरे, विजय गव्हाणे, प्रा मनोज पाटील आदींच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा -'देशात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन होत आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details