औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जीएसटी चुकवणाऱ्या (Tax evasion) दोघांना मुंबईमधून अटक करण्यात आली (two arrested in Tax evasion case) आहे. औरंगाबाद जीएसटी अन्वेषणने हा प्रकार उघडकीस आणला असून वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत (Action under Goods and Services Tax Act) फैजल आणि अजीज या दोघांना अटक करण्यात आले आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. latest news from Aurangabad, Aurangabad crime
Tax Evasion : बनावट कागदपत्रे देऊन कर चोरी, दोघांना अटक - कर चोरी
बनावट कागदपत्रांच्या आधारे जीएसटी चोरी करणे दोन युवकांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी औरंगाबाद जीएसटी अन्वेषणने कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या (two arrested in Tax evasion case). आरोपींविरुद्ध बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचा आधार घेत वस्तू व सेवा कर नोंदणी घेऊन बँकेत खाते उघडले. 18 कोटींचा कर चुकवण्यात आल्याचा (Tax evasion) आरोप आहे. latest news from Aurangabad, Aurangabad crime
![Tax Evasion : बनावट कागदपत्रे देऊन कर चोरी, दोघांना अटक Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17095670-thumbnail-3x2-japti.jpg)
तपास 18 कोटींचा उघड झाला 500 कोटींचा :बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचा आधार घेत वस्तू व सेवा कर नोंदणी घेऊन बँकेत खाते उघडत, 18 कोटींचा कर चुकवण्यात आला. याप्रकरणी मे फरहत इंटरप्राईज विरोधात जीएसटीच्या औरंगाबाद शाखेने तपास सुरू केला होता. या तपासात कंपनीच्या औरंगाबाद आणि मुंबई येथील कार्यालयांवर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तपासात मे फरहत इंटरप्राईजेस चा नोंदणी दाखला गुजरात राज्यातील राजकोट येथे असल्याचा समोर आलं. प्रोप्रायटर दावेद अजित भाई हसनानी यांच्या नावे हा परवाना आढळून आल. या प्रकरणी इंटरप्राईजेस ने 121 कोटींची बनावट बिले दाखवून 18 कोटींचे वस्तू व सेवा कर टॅक्स क्रेडिट हस्तांतरित केल्याचा दिसून आलं. मात्र प्रत्यक्षात हा आकडा 500 कोटींच्या घरात असल्याचं दिसून आले.
बनावट दस्तऐवज ताब्यात :जीएसटीने केलेल्या कारवाईत फैजल आणि अजित या दोन आरोपीकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, सिम कार्ड आदी साहित्य हस्तगत झाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक वस्तू व सेवा कर नोंदणी द्वारे आत्तापर्यंत 500 कोटींहून अधिक बनावट बिले दिल्याचे उघडगीस आलं. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात जीएसटी चुकवल्याचं समोर येत आलं आहे. याप्रकरणी फैजल आणि अजीज या दोघांना मुंबईतून अटक करून आणण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.