औरंगाबाद : नेपाळ (Nepal) येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण (In 7th International Masters Swimming) व ॲथलेटिक्स स्पर्धेत (Athletics Championships) औरंगाबादच्या राजेश भोसले (Swimmer Rajesh Bhosale) यांनी देशासाठी तीन पदकांची कमाई (won two gold and one bronze medal for country) केली आहे. यात दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याधी सलग चोवीस तास पोहण्याचा विक्रम त्यांनी केला होता.
तीन पदकांची कमाई :नेपाळ येथे झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेत राजेश भोसले यांनी चमकदार कामगिरी केली. यात तीन पदक त्यांनी जिंकली आहेत. ही स्पर्धा 50 ते 55 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात झाली होती. त्यात राजेश भोसले यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत 800 मीटर फ्रीस्टाइल आणि 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. नेपाळ आणि कतारच्या जलतरणपटूंचा त्यांनी मागे टाकत यश संपादन केले. तर ॲथलेटिक्स मधे थाळीफेक प्रकारात कांस्यपदक प्राप्त झाले. देशासाठी त्यांनी तीन पदक जिंकत देशाची मान उंचावली आहे.