छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. यावर संजय शिरसाट यांनी खिल्ली उडविली. मी दाव्याच स्वागत करतो, मलाही कळू द्या मी काय अब्रु नुकसान केले? त्यांना प्रसिद्धीची हवा आहे, असे म्हणत शिरसाट यांनी अंधारेंची खिल्ली उडविली. सुषमा अंधारेंनी दोन तरुणांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले होते, असा आरोप शिरसाट यांनी केला होता. बीडच्या दोन तरुणांवर 354 प्रमाणे 2006 साली हा गुन्हा दाखल केला. पण 12 वर्षे हे प्रकरण चालले आणि या दोघांचे आयुष्य बरबाद झाले. 12 वर्षांनंतर त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या नोकरीच्या अनेक संधी गेल्या आणि ही केस सुषमा अंधारे यांनी दाखल केली होती. या निकालाची प्रत संजय शिरसाट यांनी दाखवली. तसेच यानंतर सुषमा अंधारे हे नाव माझ्यासमोर नसणार आहे. त्यांनी कायदेशीर लढावे मी ही त्याला उत्तर देईल, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.
चव्हाण भाजपमध्ये जाणार?कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये जातील, असे त्यांच्या हालाचालींवरून वाटत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या आधीच ते भाजपात दिसेल, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर काँग्रेसतर्फे ही शक्यता नाकारण्यात आली होती. मात्र वारंवार भाजप आणि शिवसेनेच्या वतीने काही नेते चव्हाण यांच्या पक्षबदलाचे संकेत देत आहेत. असे असले तरी महाविकास आघाडीच्या संभाजीनगरच्या सभेत अशोक चव्हाण व्यासपीठावर हजर होते. इतकच नाही तर त्यांनी भाषण देखील केल आहे. त्यामुळे या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल.