औरंगाबाद - अभिनेता सुशांत सिंह राजपुतने मुंबईत आत्महत्या केली. सुशांत सिंगचा आणि औरंगाबादचे वेगळे नाते होते. त्याच्या आयुष्यात त्याला ओळख देणाऱ्या "महेंद्रसिंग धोनी" चित्रपटाच्या चित्रीकरणाचा काही भाग औरंगाबादेत चित्रित करण्यात आला होता. त्यावेळी तो काही दिवसांसाठी तो शहरात आला होता.
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांची प्रेमकथा औरंगाबादेत फुलली. साक्षी औरंगाबादच्या एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे धडे घेत होती. त्यावेळी धोनी अनेक वेळा तिला भेटायला आला होता. त्यामुळे त्याच्यावर आधारित चित्रपटात त्याची लव्हस्टोरी दाखवण्यासाठी खऱ्या लोकेशनवर जाऊन चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणी सोबत एका गाण्याचे चित्रीकरण शहरात करण्यात आले होते.