महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 12, 2019, 12:51 PM IST

ETV Bharat / state

गंगापूरमधील नुकसानग्रस्त पिकांची खासदार जलील यांच्याकडून पाहणी, सरसकट पंचनाम्याचे दिले आदेश

गंगापूर तालुक्यात अति पावसामुळे पिकांचे नुकसान. खासदार इम्तियाज जलीला यांनी शेतात जाऊन पिकांची केली पाहणी.

गंगापूरमधील नुकसानग्रस्त पिंकाची खासदार जलील यांच्याकडून पाहणी

औरंगाबाद -गंगापूर तालुक्यात अति पावसामुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, गळलिंब, आगरवाडगाव, गळनिब, धनगरपट्टी, जामगाव, आपेगाव, प्रतापपूरवाडी, कानडगाव येथील परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.

शेतकऱ्यांची खूपच बिकट परस्थीतीत आहेत. सबंधित आधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल शासनाला पाठवावा बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या आधिवेशनात आवाज ऊठवुन महाराष्ट्रा करता मोठा निधी खेचून आणणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यातील शेतीचे अति पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी तालुक्यात विविध गावांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी खासदार जलील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकासनीची पहाणी केली. दौऱ्यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेली पत्रकार परिषदेत खासदार जलील बोलत होते. पुढे बोलताना खासदार जलील म्हणाले की तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सबंधित बांधकाम विभागाचे अभीयंते व ठेकेदारावर कोणाचेही वचक नसून वरिष्ठांकडून मिली भगत असल्याने रस्त्याचे काम दर्जेदार होत नाही. मी बांधवकाम आणि जिल्हा परिषद यांना अपूर्ण रस्त्याची शिफारस करून गुणवत्ता पूर्ण करून घेणार आहे. हे काम योग्य झाल्यास अभियंता व गुत्तेदाराना सोडणार नसल्याचे खासदार जलील यांनी सांगितले

जलील यांनी तालुक्यातील कोणत्याही गावात जिल्हा परिषदेच्या पत्र्यांच्या शाळा असतील अशा सर्व शाळांची यादी बनवून महा पाठव असे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप सानप यांना आदेश केले. एक ही शाळा खोली पत्र्याची राहणार नसून माझा खासदार निधी रस्त्याच्या कामावर खर्च करणार नाही. रस्त्याच्या कामात मोठी अफरातफर होते. खासदार निधी जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी, कब्रस्थान, शादीखाना या कामावर खर्च करणार आहे. या कामात भ्रष्टाचार होत नाही. वैजापूर तालुक्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा पैसा जनतेचा आहे. या पैशातून योग्य काम न झाल्यास सबंधित आधिकाऱ्यांना जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येणार आसल्याचे पत्रकार परिषदेत खासदार जलील म्हणाले. यावेळी गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे, गट विकास अधिकारी विजय परदेशी, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांच्यासह शेतकरी अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details