सिल्लोड - सोयगाव शहरातील बेघरांना घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल योजनेसाठी जमीन संपादीत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यादी जाहीर नसल्याने प्रहार संघटना आक्रमक
सोयगाव नगर पंचायतीतर्फे शहरातील बेघर नागरिकांसाठी वर्ष २०१७ मध्ये यादी पीमसी कडे पाठवली होती. २६६ लाभार्थ्यांना घरे मंजूर झालेले आहेत. ही यादी गेल्या दोन वर्षांपासून नगर पंचायात मध्ये धूळखात पडून असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा जुंनघरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत यादी जाहीर करण्याची मागणी केली. अखेर हरकती व दुरुस्तीसाठी यादी नगर पंचायत बोर्डावर लावण्यात आल्या आहेत. मात्र त्यात संपादीत जमिनीची माहिती नसल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत.
सोयगाव येथे घरकुल योजनेसाठी मुख्याधिकाऱ्यास घेराव - soygaon
नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना प्रधान मंत्री निवास योजनेची घरकुल मंजूर झालेले असून ही यादी वर्षभरानंतर नगर पंचायतीने प्रसिद्ध केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला