औरंंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, तरी दुसरीकडे म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील रुग्णांना लागणारे औषध रुग्णालयात मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत घेतली. या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना करण्यात आली.
रुग्णालयाचे प्रशासनाकडे बोट -
गेल्या काही दिवासांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली ही समाधानकारक बाब असली तरी म्यूकोरमायकोसिस बाधितांची संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी औषध का मिळत नाही, विचारणा केली असता खासगी रुग्णालयात औषध नसल्याचे कारण सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले जात आहे.