महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - मोक्षदा पाटील - नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

गेल्या वर्षभरापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रोज बाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केला आहे.

मोक्षदा पाटील
मोक्षदा पाटील

By

Published : Apr 16, 2021, 10:42 PM IST

Updated : Apr 16, 2021, 11:05 PM IST

औरंगाबाद -वाढता कोरोनासंसर्ग चिंतेची बाब असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रोज बाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केला आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
'ब्रेक दि चेन' मोहिमेअंतर्गत कोरोनाची साखळी तोडायचे आहे. यासाठी नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच राजकीय सभा, वाढदिवस किंवा जास्त लोकं एकत्र येऊन गर्दी करू नये. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य कर्मचारी पोलीस रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यांच्या कामाला नागरिकांनी दाद द्यावी. यंत्रणांनादेखील माणूस म्हणून काही मर्यादा असू शकतात. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी वेळेत करून नागरिकांनी घरी राहावे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.हेही वाचा-आधी आईचा मृत्यू, नंतर मुलगा, नातू, पहिली बहिण, दुसरी बहिण, येवल्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने मृत्यू
Last Updated : Apr 16, 2021, 11:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details