सुपारी हनुमान मारुती, बालरुपात देतो दर्शन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -हनुमान जयंती निमित्त सर्वत्र जय्यत तयारी केली जात आहेत. शहरातील सर्वात प्राचीन असे ग्राम दैवत समजले जाणारे सुपारी मारोती मंदिर परिसर सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करणारा, नवसाला पावणारा मारोती अशी आख्यायिका प्राचिलीत आहे. इतकंच नाही तर संभाजी नगरच नऊ नाही तर इतर ठिकाणाहून राजकीय मंडळी दर्शन आरती करण्यासाठी येत असतात त्यामुळे एक वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. या मंदिरात हनुमान बाल रूपात दर्शन देतात अशी माहिती मंदिर विश्वस्त शैलेश पुजारी यांनी दिली.
हनुमानाने सुपारी रूपात दिला आशीर्वाद :जुना शहरात सुपारी मारुती प्रसिद्ध असलेलं देवस्थान मानलं जातं. सुमारे 400 ते 500 वर्षांपासून चे हे मंदिर अस्तित्वात असल्याचं विश्वस्तांनी सांगितलं. प्राचीन माहिती नुसार जुन्या काळी आशीर्वाद स्वरूपात सुपारी मिळायची, याच ठिकाणी एका भक्ताला हनुमानाने दर्शन स्वरूपात सुपारी दिली होती. त्या ठिकाणी ही सुपारी ठेवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती. बालरूपातले हनुमान या ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त मुखवटा असून डोळे आणि हसरा चेहरा अशी मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. 1792 साली मंदिराची झालेल्या बैठकीचे पुरावे आजही असून, मंदिराला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळेच रोज हजारो भक्त दर्शनासाठी मंदिर परिसरात येतात, अशी माहिती विश्वस्त शैलेश पुजारी यांनी सांगितली.
दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर :शहरातील प्राचीन मंदिरात सुपारी मारुती मंदिराची ओळख आहे. मंदिर देखील विशेष बांधणीचे निर्माण करण्यात आले आहे. जुन्या काळी असलेले मंदिर कालांतराने जीर्ण झाले आणि त्यानंतर 1998 मध्ये मंदिराचा 1998 ते 2001 या काळात मंदिराची बांधणी नव्याने करण्यात आली. दक्षिणात पद्धतीची मंदिर रचना उभी केल्याने आकर्षक रूप प्राप्त झाले. मंदिराच्या कळसावर मारुतीच्या 30 वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. यामध्ये लक्ष्मण आजारी असताना त्यासाठी संजीवनी जडीबुटी घेऊन जातानाचा मारुती, अशा अनेक वेगवेगळ्या रूपात मारुतीचे दर्शन मंदिराच्या बाहेरून घेता येते. इतकेच नाही तर मंदिराच्या मागच्या बाजूने शिव शंकर पार्वतीची मूर्ती आणि समोर गणपती पाहायला मिळतो. रुद्रावतार दर्शवण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्ट शैलेश पुजारी आणि दिनेश पुजारी यांनी दिली.
पुजारी कुटुंबियांना मिळतो मान :सुपारी हनुमान मंदिर 300 ते 400 वर्षाची परंपरा दर्शवतो. एक आठवडाभर भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात लीन होतो. या मंदिराची पूजा करण्याचा मान पुजारी कुटुंबियांना मिळाला आहे, आज दहावी पिढी सुपारी हनुमानाचे भक्ती करत आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाईल अशी माहिती पुजारी कुटुंबीयांनी दिली. तर राजकारणी मंडळी देखील सुपारी मारुतीच्या चरणी नेहमीच येत असतात. वर्षभरातील राजकीय सोहळे वर्धापन दिन अशा कार्यक्रमांना राजकीय मंडळी आरती करत असतात. यात भाजप शिवसेना आणि मनसे या पक्षांचे नेते नित्यनियमाने दर्शनाला येतात अशी माहिती शैलेश पुजारी यांनी दिली.
हेही वाचा - Anil Ambani : 28 एप्रिलपर्यंत अनिल अंबानींवर कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश