गंगापूर (औरंगाबाद) :सुनिल प्रकाश जमधडे असे मयत तरुणाचे नाव असून, अक्षय बापुसाहेब वीर (वय 21 वर्ष, रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण) असे ताब्यात घेतलेल्या पहिल्या आरोपीचे नाव आहे. गणेश गोपीनाथ जगदाळे (राहणार- पानरांजणगाव, ता. पैठण) असे गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपींनी तरुणाला दारू पाजून गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर मयताची ओळख मिटविण्यासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला. दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली होती.
फरार आरोपीस घेतले ताब्यात :मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे हा त्याच्या घरी पानरांजणगाव येथे आलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने पणरांजणगाव येथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे हा त्याच्या राहत्या घरी मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मयत सुनील प्रकाश जमदाडे यास आरोपी अक्षय बापूसाहेब वीर आणि आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे या दोघांनी मारहाण करून रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर मयताचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याची कबुली आरोपी गणेश गोपीनाथ जगदाळे याने दिला. यावरून गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.