औरंगाबाद -कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्या विरोधात दखल घेणार, असे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे असून यावर राज्य महिला आयोग निश्चित कारवाई करेल, असे मत देखील रहाटकर यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल हेही वाचा -नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक
भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा या नात्याने धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त करावे, अशी मागणीही रहाटकर यांनी केली. धनंजय मुंडे यांनी समस्त महिलांचा तर अवमान केलाच त्याच बरोबर बहीण भावाच्या पवित्र नात्याचा अवमान केला आहे. राज्य महिला आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करून घेतली आहे. लवकरच याबाबत कारवाई करणार असून धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे महिलांनी राजकारणात सक्रिय राहू नये का? हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे रहाटकर म्हणाल्या.
हेही वाचा -धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर पंकजा मुंडे समर्थक संतप्त, परळी पोलिसांत गुन्हा दाखल