महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेतन न मिळाल्यामुळे कोवीड सेंटरमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना - Aurangabad corona news

आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कोव्हीड सेंटरमधील कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी (दि.८) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

police station
police station

By

Published : Oct 9, 2020, 1:45 AM IST

औरंंगाबाद - देवगिरी महाविद्यालय परिसरात असलेल्या कोव्हीड सेंटरमधील कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतल्याची माहिती आहे. गुरूवारी (दि.८) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

रणजीत डिगांबर पगारे (वय ३०, रा.गुलाबवाडी, जयभीमनगर) असे आत्महत्या करणाऱ्या कोवीड सेंटरमधील कर्मचाऱ्याचे नाव आहे. रणजीत पगारे हे देवगिरी बॉईज हॉस्टेल येथील कोवीड केअर सेंटरमध्ये कंत्राटदाराकडून नोकरीला होते. गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळत नसल्यामुळे ते आर्थिक चणचणीत सापडले होते. शिवाय कर्जबाजारी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात आले होते. या तणावातूनच रणजीत पगारे यांनी गुरूवारी सकाळी छताच्या सिलींग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details