महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - औरंगाबादमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

गारखेडा परिसरात राहणारी संजीवनी एकनाथ घेणे ही इयत्ता सातवीत शिकत होती. तिचे आई-वडील दोन्ही फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. आई वडील व लहान भाऊ असे तिघेही फुटाणे विक्रीसाठी गेले होते. ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता, घराचा बाहेरील दरवाजा बंद असल्याचे त्यांना आढळले.

aurangabad minor girl Suicide
aurangabad minor girl Suicide

By

Published : Mar 2, 2021, 5:37 PM IST

औरंगाबाद -सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस आली. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे (वय-14 रा.गल्ली क्र.4 आनंदनगर, गरखेडा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.

गारखेडा परिसरात राहणारी संजीवनी एकनाथ घेणे ही इयत्ता सातवीत शिकत होती. तिचे आई-वडील दोन्ही फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. आई वडील व लहान भाऊ असे तिघेही फुटाणे विक्रीसाठी गेले होते. ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता, घराचा बाहेरील दरवाजा बंद असल्याचे त्यांना आढळले.

संजीवनीला आवाज दिला असता ती दिसून न आल्याने शेजारी गेली असावी, असे घरच्यांना वाटले. मात्र काही वेळा नंतर लहान भाऊ जेंव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेंव्हा संजीवणीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अंगलला गळफास घेतल्याचे त्याला दिसले. पोलिसांनी संजीवणीला फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

नेहमी हसत खेळत राहणाऱ्या संजवणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले, याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरिक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा - फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये नापास

ABOUT THE AUTHOR

...view details