गंगापूर (औरंगाबाद) :ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने शेत मालकासह परिसरातील शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेत आग (Sugarcane Fire Aurangabad) विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाळूज पोलिसांना माहिती देऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. (Latest news from Aurangabad) तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (Aurangabad Crime) तोडणीस आलेला ऊस, व ठिबकचे पाईप. असे अंदाजे 6 लाख रुपयाचे नुकसान (Farmers lose lakhs due to fire) झाले आहे. (sugarcane burnt to ashes)
Sugarcane Fire Aurangabad : तोडणीस आलेल्या ऊसाला आग लागून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - ऊसाला आग औरंगाबाद
गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग (Sugarcane Fire Aurangabad) लागून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रोजी घडली आहे. (Aurangabad Crime) या घटनेत पाच शेतकऱ्यांचे तोडणीस आलेला ऊस व तोडणी झालेल्या ऊसाचे फुटवे जळून मोठे नुकसान झाले (Farmers lose lakhs due to fire) आहे. लग्नात फटाके वाजवल्याने ऊसाला आग लागून लाखो रुपयाचा ऊस जळून खाक (sugarcane burnt to ashes) झाला. असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. (Latest news from Aurangabad)
पाच शेतकऱ्यांचे नुकसान :लिंबेजळगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३ मधील शेतकरी चंद्रशेखर त्रिंबक आलोने, सुरेश त्रिंबक आलोने, अवंतिका त्रिंबक आलोने , दत्तात्रय हरिभाऊ आलोने व गट क्रमांक १७ मधील सुलेमान मोहम्मद खान यांच्या शेतातील जवळजवळ दहा एकर क्षेत्रावर ऊस लावलेला होता. यातील अधिकांश ऊस तुटून कारखान्याला गेला असल्याने उसाचे फुटवे दोन ते तीन फुट लांबीचे झाले होते. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता.
दोन बंबांनी विझवली आग :ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच महानगर पालिका औरंगाबाद व वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. तोपर्यंत बराचसा ऊस जळून खाक झाला होता. ही आग विझवण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे उपअग्निशमन अधिकारी डी. डी. साळुंखे, महेंद्र खोतकर, परमेश्वर साळुंखे, वाहन चालक सुभाष दुधे तसेच वाळूज अग्निशामन दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले. या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.