औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नायगव्हानच्या जिल्हापरीषद शाळेत एकच शिक्षकची नेमणूक करण्यात आली. हे शिक्षक गैरहजर असले तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट औरंगाबाद जिल्हा परिषदेत शाळा भरवत आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी थेट औरंगाबाद जिल्हा परिषदेत भरवली शाळा; शिक्षक देण्याची मागणी - औरंगाबाद
औरंगाबाद पासून साधारणतः १०० किलोमीटर अंतरावर वैजापूर तालुक्यात नायगव्हान येथे जिल्हा परिषदेची शाळा भरते. एकेकाळी सर्वशाळांसमोर आदर्श असलेली ही शाळा आज मात्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
औरंगाबाद पासून साधारणतः १०० किलोमीटर अंतरावर वैजापूर तालुक्यात नायगव्हान येथे जिल्हा परिषदेची शाळा भरते. या शाळेत पहिली ते चौथी या वर्गांमध्ये 28 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर नव्या शैक्षणिक वर्षात दहा ते बारा विद्यार्थी नव्याने प्रवेश घेणार आहेत. एकेकाळी सर्वशाळांसमोर आदर्श असलेली ही शाळा आज मात्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
लोखंडे नावाचे एकच शिक्षक पहिली ते चौथी या वर्गातील २८ विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या शिक्षकांना देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले तर ते देखील शाळा उघड्यावर सोडून निघून जातात. त्यामुळे पहिल्या वर्गात १० विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी थांबले आहेत, तर पाचवीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्या, या मागणीसाठी नायगव्हान येथील जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत शाळा भरवत आंदोलन केले. दोन तास आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.